Supriya Sule On Bharat: इंडिया नाव बदलण्यासाठी १४ हजार कोटींचा खर्च; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

केंद्र सरकारने जी-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा केला होता.
Supriya Sule On Bharat
Supriya Sule On BharatSaam TV

India Vs Bharat:

विरोधी पक्षाने आपल्या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव दिलं आहे. या नावानंतर केंद्र सरकारने देशाचं इंडिया नाव बदलून भारत ठेवण्याच्या हालचालींना सुरुवात केल्याचं म्हटलं जातंय. केंद्र सरकारने जी-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख 'प्रेसिडेंट ऑफ भारत', असा केला. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Bharat News)

Supriya Sule On Bharat
Supriya Sule News: अजित पवारांच्या आठवणीने सुप्रिया सुळे रडल्या; 'त्या' फोटोत नेमकं काय पाहिलं

केंद्र सरकारने इंडिया नाव बदलून भारत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कामासाठी ते तब्बल १४ हजार रुपये कोटींचा खर्च करणार आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

देशाचे नाव इंडिया बदलून भारत असं केलं जात आहे. या वादावर सुप्रिया सुळेंनी पुढे म्हटलं की, "मोदी सरकारने इंडिया आघाडीचा इतका धसका घेतलाय की नाव बदलून टाकले आहे. ते इतका धसका घेतील असं मला वाटलं नव्हतं."

खासदार सुप्रिया सुळे आज पंढरपूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने कांदा आणि टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आयात केली आहे. अशात दर पडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

लोकसभेत कांद्याच्या प्रश्नावर सर्वाधिक आवाज मी उठवल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील देखील उपस्थित होते.

Supriya Sule On Bharat
India vs Bharat Row: गेट ऑफ इंडियाला काय म्हणायचं? शरद पवारांचा 'इंडिया' नाव बदलण्यावरून मोदींवर निशाणा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com