जम्मू- कश्मीरमध्ये ड्युटीवर असणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवानाचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू

बीडच्या राजेगावमध्ये हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार संपन्न
जम्मू- कश्मीरमध्ये ड्युटीवर असणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवानाचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू
Beed soldier विनोद जिरे

बीड: भारतीय सैन्य दलात जम्मू कश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) ड्युटी करणाऱ्या, जवान भारत रामराव राठोड यांचा पुण्यात (Pune) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भारत राठोड हे बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यात असणाऱ्या, बाराभाई तांडा, राजेगाव येथील आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आणि मनात देशसेवा करण्याचं स्वप्न असल्याने, 2012 मध्ये, ते नागपूर (Nagpur) येथे सैन्य दलात भरती झाले होते.

हे देखील पहा-

जम्मू येथे जनरल ड्युटीवर असतांना भारत राठोड आजारी पडल्याने त्यांना पुण्यातील कमांडो रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतांनाच जवान भारत राठोड यांची प्राणज्योत मालवली आहे. अहमदनगर (Ahmednagar) येथे त्यांना आर्मीच्या तुकडीने मानवंदना देण्यात आली आहे. तर आज त्यांच्या पार्थिवावर बारभाई तांडा राजेगाव येथे, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले आहेत.

Beed soldier
गुजरातमध्ये पाकिस्तानची सागरी घुसखोरी आढळून आली; BSF कडून बोट जप्त

यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी '"अमर रहे अमर रहे, भारत राठोड अमर रहे". "भारत माता की जय". जय जवान जय किसान यासह अनेक घोषणांनी हजारो नागरिकांनी त्यांना, साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com