लस घेणार नाही म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांकडून लसीकरण जनजागृतीला सुरुवात!

कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी जालन्यातील बदनापूर मध्ये कोरोना लस घ्या असं आवाहन केलंय.
लस घेणार नाही म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांकडून लसीकरण जनजागृतीला सुरुवात!
इंदोरीकर महाराज SaamTvNews

जालना : कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस घ्या असं आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केलंय. जालना जिल्ह्यातून त्यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केलीय.

हे देखील पहा :

"आपण लस घेतली नाही.! आणि घेणार सुद्धा नाही.! प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये ! आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन तरी काय? करणार? कोरोनावर एकच औषध आहे, ते म्हणजे मन खंबीर ठेवा अस म्हणाऱ्या महाराजांनी इंदोरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, कोरोना तणावमुक्त करा असं आवाहन करत कोरोना जनजागृतीला सुरुवात केलीय.

इंदोरीकर महाराज
खटला रद्द करण्यासाठी मलिकांचे जावई समीर खान यांची हायकोर्टात धाव!

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या सेलिब्रिटीची मदत घेतली जातीय. त्यात इंदोरीकर महाराजांचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोरोनाला हरवण्यात पोलीस, डॉक्टर आणि सामाजिक संस्था यांचं मोठं योगदान आहे असंही त्यांनी त्यांच्या किर्तनातून सांगितलं आहे. महाराष्ट्राचा खरा कोरोना योद्धा राजेश टोपे असून जनतेच्या बाबतीत पोलीस आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, इंदोरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. इंदोरीकर महाराजांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात केल्यानं टोपे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com