Aurangabad: इंदुरीकर महाराजांच्या विधानाबाबत आज खंडपीठात सुनावणी

इंदुरीकर महाराजांनी पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज सुनावणी होणार
Aurangabad: इंदुरीकर महाराजांच्या विधानाबाबत आज खंडपीठात सुनावणी
Aurangabad: इंदुरीकर महाराजांच्या विधानाबाबत आज खंडपीठात सुनावणी Saam Tv

औरंगाबाद: इंदुरीकर महाराजांनी पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठात आज सुनावणी होणार आहे. इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) एका कीर्तनातून पुत्ररत्न प्राप्तीच्या संदर्भाने जाहीरपणे विधान केले होते. त्याविरोधात संगमनेर (Sangamner) येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष अ‍ॅडव्होकेट रंजना गवांदे यांनी नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती.

हे देखील पहा-

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात (court) गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानंतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या कलम २८ नुसार तक्रार केली. न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांना समन्स काढण्याचे आदेश दिले आहे.

Aurangabad: इंदुरीकर महाराजांच्या विधानाबाबत आज खंडपीठात सुनावणी
Crime: सबसे बडा रुपैया... प्रॉपर्टीसाठी आई-वडील आणि लहान भावाचा फिल्मी स्टाईलने खून, लखनऊ हादरले

त्याविरोधात इंदुरीकरांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने पुनर्विलोकन अर्ज मंजूर करत प्रथम वर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केला. या विरोधात रंजना पगारे- गवांदे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. आज त्यावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com