धक्कादायक प्रकार! रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; बाळंत महिलेलाही मारहाण

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर !
धक्कादायक प्रकार! रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; बाळंत महिलेलाही मारहाण
धक्कादायक प्रकार! रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; बाळंत महिलेलाही मारहाणसागर गायकवाड

सागर गायकवाड

नाशिक: नाशिकमधून Nashik एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी आहे समोर आली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात Nashik district Hospital रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू Infant Death झाला आहे. आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे बाळंत झालेल्या महिलेला रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यानी मारहाण देखील केली आहे. कालच (ता. ११) लातूर मध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नवजात बालक विभागात आग लागली होती. आता या आणखी एक नाशिकमधील रुग्णालयातील हलगर्जीपणाच्या घटनेमुळे रुग्णालयातील नवजात बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर येत आहे.

हे देखील पहा-

प्रसूती होत असताना डॉक्टर, नर्स गायब !

कुठल्या ना कुठल्या कारणांनी नाशिकचे हे जिल्हा रुग्णालय चर्चेत येत असते. आत्ताही एका अर्भकाच्या मृत्यूनंतर हे रुग्णालय चर्चेत आल आहे. विशेष म्हणजे महिला बाळंत होत असतांना डॉक्टर किंवा इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने महिला बेडवर प्रसूती झाल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय प्रसूती दरम्यान हे अर्भक बेडवर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी प्रसूती झालेल्या महिलेने केला आहे.

याशिवाय हे सगळ घडल्यानंतर प्रसूती झेलेल्या महिलेलाच मारहाण केल्याची बाब ही प्रसूती झालेल्या महिलेने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे दिलेल्या तक्रारीत म्हंटल आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी प्रसूती झालेल्या महिलेकडून आणि तिच्या पतिकडून करण्यात आली आहे. 

धक्कादायक प्रकार! रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; बाळंत महिलेलाही मारहाण
कोल्हापुरात कारचा भीषण स्फोट; दरीत कोसळली कार, एकाचा होरपळून मृत्यू

बाथरूमला जात असतांना भिंतीवर ढकलुन देत कानशिलात लगावली;

दरम्यान, महिलेने दिलेल्या तक्रारीत, प्रसूती झालेल्या महिलेला सफाई कर्मचारी महिलेने बाथरूमला जात असतांना भिंतीवर ढकलुन देत कानशिलात लगावली आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गंभीर असल्याने याची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.  

एकूणच काय तर घडलेला प्रकरण गंभीर असून चौकशीत काय ते समोर येईलच. मात्र कुठल्या ना कुठल्या वादात राहणारे हे रुग्णालयावर शासन योग्य ती कारवाई करेल का ? हा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com