Insurance News: शेतकऱ्यांची मोठी फसवणूक; पीक विमा योजनेचं काम पाहणाऱ्या AIC कंपनीची १६ कार्यालये बंद!

शेतकऱ्यांचे म्हणणे आम्ही ऐकत आहोत आणि लवकरच त्यांचे पैसे परत करणार आहोत असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना शांत केले.
Insurance News
Insurance NewsSaam Tv

Insurance News: शेतकरी वर्गासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. प्रधानमंत्री विमा योजनेचे काम बघणाऱ्या AIC कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण १६ जिल्ह्यात या कंपनीची सर्व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कंपनी मार्फत विमा उतरवला होता. यात कोट्यावधींचा प्रीमियम भरलेले अनेक शेतकरी आहेत. मात्र आता कंपनीच्या या निर्णयाने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

AIC ही निमशासकीय कंपनी (Company) आहे. या कंपनीने शेतकऱ्यांचा विमा उतरवल्यानंतर कालावधी पूर्ण केलेल्या अनेक शेतकऱ्यांना विम्याच्या अर्धीच रक्कम परत केली, तर काही शेतकऱ्यांना काहीच पैसे परत केले नाही. शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक लक्षात घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर त्यांच्या मदतीसाठी धावून आले. गेल्या महिन्यात त्यांनी अनेक आंदोलने केली. याने शेतकरी आणखीन जागृत झाले आणि AIC कंपनीला पैस का परत करत नाही? योजनेचा लाभ लवकर द्या असा तगादा लावला.

Insurance News
Farmer Protest : सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकाऱ्यांचं मुंबईत उद्या आंदोलन ; पाहा व्हिडीओ

शेतकऱ्यांचे म्हणणे आम्ही ऐकत आहोत आणि लवकरच त्यांचे पैसे परत करणार आहोत असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना शांत केले. त्यानंतरही काही ठरावीक शेतकऱ्यांना (Farmer) मोबदल्यात आर्धी रक्कम दिली. तर अनेक शेतकऱ्यांना अजूनही रखडवत ठेवले आहे. या मुळे शेतकऱ्यांनी बुलढाणा कृषी अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या सहाय्याने या कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Insurance News
Farmer FRP : आता शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळणार ; शिंदे सरकारचा निर्णय

त्यामुळेच या कंपनीने १६ जिल्ह्यातील कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. AIC कंपनीने असे केल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. एक एक पैसा साठवून केलेली गुंतवणुकीत कोणताही लाभ मिळत नाही, जमा झालेले पैसे देखील परत केले जात नाही यामुळे शेतकरी चिंतेच आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com