चिपी विमानतळाची अधिकाऱ्यांसह, पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्याकडून पाहणी
चिपी विमानतळाची अधिकाऱ्यांसह, पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्याकडून पाहणी SaamTvNews

चिपी विमानतळाची अधिकाऱ्यांसह, पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्याकडून पाहणी

चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय हवाईमंत्री जोतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय हवाईमंत्री जोतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सोबतच विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतेही राजकारण होणार नाही असेही ते म्हणाले. उद्घाटनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे महाराष्ट्र सरकारचे MIDC व पर्यटन विभाग प्रोटोकॉल नुसार ठरवतील. तसेच जे येतील त्यांच स्वागतच आहे असेही ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव न घेता म्हणाले.

हे देखील पहा :

चिपी विमानतळाच्या नामकरणाची मागणी करण्यात आली असून तसा प्रस्ताव देखील राज्य सरकारला पाठवला आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

चिपी विमानतळाची अधिकाऱ्यांसह, पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्याकडून पाहणी
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!
चिपी विमानतळाची अधिकाऱ्यांसह, पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्याकडून पाहणी
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच

चिपी विमानतळासंदर्भात आम्हाला कोणतेही श्रेय घ्यायचे नाही. अवघ्या २५०० रुपयांत सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे. याचा आनंद असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले. चिपी विमानतळ कोणी सुरु केले हे महत्त्वाचे नाही तर विमानतळ सुरू होऊन जिल्हावासीयांना विमान सेवा मिळावा हा हेतू आहे. चिपी विमानतळाला चारी बाजूला रस्त्याची कनेक्टिव्हिटी केली आहे. पिंगुळी ते चिपी विमानतळ रस्ता उद्घाटनापर्यंत खड्डे मुक्त करू यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र पाऊस गेल्यानंतर हा रस्ता करणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com