राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून सांगली जिल्ह्यात पाहणी
राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून सांगली जिल्ह्यात पाहणीSaamTv

राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून सांगली जिल्ह्यात पाहणी

सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा घेतला आढावा.

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे टास्क फोर्स सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या वाळवा, पलूस आणि कडेगाव या तीन तालुक्यांची आज पाहणी केली आहे. Inspection in Sangli district by state health advisors

हे देखील पहा -

डॉ. सुभाष साळुंखे हे राज्याचे आरोग्य महासंचालक म्हणून निवृत्त झाले असून त्यांनी दीर्घकाळ जागतिक आरोग्य संघटने सोबत काम केलेले आहे. राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ अद्याप कायम आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी खटाटोप करूनही आकडेवारी कमी होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. साळुंखे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून सांगली जिल्ह्यात पाहणी
बनावट दस्तावेजावर पासपोर्ट बनवून विदेशवारी करणाऱ्याला अटक !

वाळवा, पलूस आणि कडेगाव या तीन तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरात कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा उडाला होता. त्यामुळे तेथे रुग्ण संख्या सातत्याने वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे डॉ. साळुंखे यांनी तेथील परिस्थितीचा प्राधान्याने आढावा घेतला. तपासण्या, संपर्क शोध, विलगीकरण याबाबत आरोग्य विभागाला काही विशेष सूचना केल्या आहेत. कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे हे या दौर्‍यात सहभागी झाले आहेत.

उद्या डॉक्टर साळुंखे हे मिरज तालुक्यासह महापालिका क्षेत्रात पाहणी करणार आहेत. महापालिका, जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संवाद साधून कोरोना रूग्णालयाला भेट देतील आणि तेथील व्यवस्थेची पाहणी करतील असे सांगण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com