
नाशिक: आंतरजातीय विवाह केल्याने महिलेला शासकीय योजनांचे लाभ नाकारण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) इगतपुरी तालुक्यातील रायंबे गावात हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायत आणि जात पंचायत सदस्यांनी बळजबरीने लाभ नाकारत असल्याचा अर्जही लिहून घेतला आहे.
राज्यात जात पंचायतीच्या अमानुष प्रकाराच्या अनेक घटना समोर येत असताना नाशिक जिल्ह्यात असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. केवळ आंतरजातीय विवाह केला म्हणून आदिवासी ठाकर समाजातील महिलेला शासकीय आणि निमशासकीय योजनांचे लाभ नाकारण्यात आले.
या महिलेनं समाजाच्या विरोधात जात ५ मे ला आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे जात पंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती अंतर्गत तिला मिळणारे शासकीय निम शासकीय योजनांचे लाभ नाकारले. केवळ इतक्या वरच हे प्रकरण थांबलं नाही तर महिलेवर दबाव टाकून मी कोणत्याही शासकीय योजनांचे लाभ घेणार नाही, घेतल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा अर्ज ही लिहून घेण्यात आला. हा प्रकार समोर आल्यानंतर जात पंचायत मूठमाती अभियानाच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला असून याची तक्रार नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
संबंधित ग्रामपंचायत आणि जात पंचायतीच्या सदस्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अनुसूचित जातीतील या पिडीत महिलेने आंतरजातीय विवाह केला असला, तरी तिला शासकीय योजनांचा लाभ नाकारण्याचा अधिकार जात पंचायत आणि ग्रामपंचायतीला कुणी दिला? असा प्रश्न उपस्थित झाला असून राज्यातील जात पंचायतीचा जाच अजूनही थांबला नसल्याचं यावरून स्पष्ट होतंय. त्यामुळे जात पंचायतींना चाप लावण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.