Nagpur : "तू मोठा की मी मोठा" या वादातून झाला खून!

अजय आणि आकाश दोघे मित्र दारू पीत बसले होते. दोघांमध्ये तू मोठा की मी मोठा या गोष्टीवरून भांडण झाले. दारूच्या नशेमध्ये झालेल्या या भांडणाचे पर्यवसन गुन्ह्यात झाले.
Nagpur : "तू मोठा की मी मोठा" या वादातून झाला खून!
Nagpur : "तू मोठा की मी मोठा" या वादातून झाला खून!Saam Tv News

मंगेश मोहिते

नागपूर : यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेमध्ये झालेल्या भांडणात मित्राने आपल्याच मित्राचा खून केला आहे. मृतकाचे नाव अजय भारती असून आरोपीचे नाव आकाश पुरी असे आहे. काल रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हे देखील पहा :

मृतक अजय भारती आणि आकाश पुरी हे जुने मित्र आहेत. गणेशोत्सवाच्या दरम्यान अजयच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. अजय आणि आकाश दोघे जण दारू पीत बसले असता दोघांमध्ये तू मोठा की मी मोठा या गोष्टीवरून भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला ला कि त्याचे रूपांतर चाकूने मारण्यापर्यंत झाले.

Nagpur : "तू मोठा की मी मोठा" या वादातून झाला खून!
Pune : निवृत्त ACP असल्याचे सांगून शिक्षिकेवर बलात्कार; वाचा घटनेचा सविस्तर वृत्तांत

आकाशने अजयच्या पोटात चाकू खुपसला आणि त्याने स्वतः अजयला 100 मीटर दूर असणाऱ्या समर्पण हॉस्पिटल मध्ये नेले. पण, उपचार घेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. आकाश ने संबंधित लोकांना माहिती दिली असता लोकांनी त्याला सांगितले की तू पोलीस स्टेशन ला जाऊन आत्मसमर्पण कर, त्यांचे म्हणणे आकाशने मानले आणि त्याने पोलीस स्टेशन आत्मसमर्पण केले. यशोधरा नगर पोलीस या खुनाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com