Akola: मुंडगावकर ज्वेलर्सने फसविलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार?

या प्रकरणी २ आरोपींची निष्पन्न झालेली स्थावर मालमत्ता संरक्षीत करण्यात आली आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिली हाेती.
Akola: मुंडगावकर ज्वेलर्सने फसविलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार?
Money Saam Tv

अकाेला : अकोला (akola) येथील मुंडगावकर ज्वेलर्स (mundgaonkar jewelers) आणि त्यांच्या विविध फर्मकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना (investors) आता त्यांचे पैसे (money) परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तांची विल्हेवाट लावून त्यातून प्राप्त हाेणारी रक्कम गुंतवणूकदारांना वितरित करावी असा प्रस्ताव राज्य शासनाकडे (maharashtra government) पाठविण्यात आला आहे. दरम्यान मुंडगावकर यांच्या आणखी काही स्थावर मालमत्तेचा शोध अकोला आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे. (mundgaonkar jewelers case latest updates)

अकोल्यातील मुंडगावकर सराफा व्यावसायिकाने हुंडा चिट्ठीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्याज देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४७० जणांची फसवणूक केली आहे. त्यातून गुंतवणूकदारांची सुमारे १८ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी २ आरोपींची निष्पन्न झालेली स्थावर मालमत्ता संरक्षीत करण्यात आली आहे. तर उर्वरित जणांची मालमत्ता निष्पन्न करून त्यास संरक्षित करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (shambhuraj Desai) यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिली हाेती.

Money
Loudspeaker Row: 'जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा'

दरम्यान पोलिसांनी मुंडगावकर यांची मालमत्ता जप्त केली असून गुंतवणूकदार यांना रक्कम परत देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणुकदारांना पैसे मिळतील अशी आशा आहे.

Edited By : Siddharth Latkar

Money
Sangli Breaking News: आईचा खून करणा-या मुलास पाेलीसांनी घेतले ताब्यात
Money
नकली सेंद्रिय उत्पादनांवर FDA ची राहणार करडी नजर : डॉ. राजेंद्र शिंगणे
Money
खून्नशीतून मांजरी बुद्रुकच्या माजी सरपंचावर गाेळीबार; उपचारार्थ रुग्णालयात दाखल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.