IPS Officers Fake Transfer List: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल, चेक करा लिस्ट

अशी कुठलीही यादी गृहविभागाकडून सध्यातरी जाहीर झालेली नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
IPS
IPSSaam TV

>> गोपाळ मोटघरे, सूरज सावंत

मुंबई : राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची बनावट यादी सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राज्य पोलिस दलातील अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या आधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात मुख्यमंत्री-गृहमंत्री एकमत होत नसल्याने राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक अधिकारी यांच्या बद्दल सध्या रखडल्या असल्याचं बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज सोशल मीडियातून काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फेक यादी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. बदल्यांच्या फेक यादीत नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, निसार तांबोळी, रवींद्र सिसवे, देवेन भारती, दीपक पांडे, लखमी गौतम, संजय दराडे, आरती सिंह, ज्ञानेश्वर चव्हाण, यशस्वी यादव, सत्यनारायण चौधरी, मनोज लोहीया यांच्यासह अनेक अतिवरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

मात्र अशी कुठलीही यादी गृहविभागाकडून सध्यातरी जाहीर झालेली नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या बनावट अध्यादेश काढल्याचेही समोर आले होते. या प्रकरणी मरिनड्राइव्ह पोलीस ठाण्यात गृह विभागातील सचिवांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत मरिनड्राइव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत.

सोशल मीडियावरील व्हायरल IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची बनावट यादी

 • आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर

 • संजीव सिंघल, पोलीस आयुक्त नवी मुंबई

 • अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर

 • ब्रिजेश सिंह, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड

 • विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त मिरा भाईंदर

 • प्रभात कुमार, अप्पर पोलीस महासंचालक सुरक्षा महामंडळ

 • मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नागपूर शहर

 • निसार तांबोळी, पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र

 • अनुप कुमार सिंह, प्रमुख दहशतवादी विरोधी पथक

 • देवेन भारती, आयुक्त राज्य गुप्ता वार्ता

 • प्रविण पडवळ, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर

 • रविंद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था मुंबई

 • दिपक पांडे, पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र

 • एस. जयकुमार, सह पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे मुंबई

 • संजय मोहीते, सह पोलीस आयुक्त प्रशासन मुंबई

 • लखमी गौतम, सहपोलीस आयुक्त वाहतूक

 • के एम प्रसन्ना, सहपोलीस आयुक्त गुन्हे

 • राजीव जैन, अतिरिक्त पोलीस आयुक्त मध्य

 • संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दक्षिण

 • अभिषेक त्रिमुखे, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे

 • आरती सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त पश्चिम

 • चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलीस आयुक्त विशेष शाखा

 • परमजित सिंह दहिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त उत्तर

 • ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त नागपूर शहर

 • यशस्वी यादव, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र

 • छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर

 • अस्वती दौरजे, पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र

 • कृष्णप्रकाश पोलीस महानिरिक्षक, नक्षल विरोधी पथक नागपूर

 • सत्यनारायण चौधरी, पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र

 • मनोज लोहिया, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर

 • संजय बाविस्कर, पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ

 • बाळासाहेब शेखर, महानिरीक्षक सुधार सेवा

 • सुनील फुलारी, सहपोलीस आयुक्त पुणे शहर

 • संदिप कर्णिक, पोलीस महानिरीक्षक मोटर वाहन पुणे

 • रंजन कुमार शर्मा, पोलीस आयुक्त अमरावती शहर

 • सुधीर हिरेमठ, अप्पर पोलीस आयुक्त नागपूर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com