कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांने केली आत्महत्या!

तलावात उडी मारून आत्महत्या केली.
कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांने केली आत्महत्या!
कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांने केली आत्महत्या!Saam Tv

अकोला : मोठी उमरी हातेकर वाडी लक्ष्मी नगर परिसरातील ४० क्वार्टर भागातील तलावात एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली. नंदकिशोर बाळकृष्ण भाकरे वय अंदाजे ५० वर्षे असे आत्महत्या (Suicide) केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Irrigation department employees commit suicide)

हे देखील पहा -

नंदकिशोर भाकरे यांनी घरातूनन जाताना कामावरती जातो असे सांगून ते घरातून निघाले होते. मात्र नंतर त्यांचा मृतदेहच मिळाला ते कामावरती गेले नाहीत आणि मागे घरीही परतले नाही. ते पाटबंधारे विभागामध्ये कार्यरत होते. तलावाच्या बाहेर त्यांची दुचाकी एमएच 30 एयु 9953 उभी होती. एक बॅग सुद्धा ठेवलेली आढळली आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलिस (MIDC Police) दाखल झाले आहे. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com