Navi Mumbai: नवी मुंबईची सागरी सुरक्षा धोक्यात?

नवी मुंबई पोलिसांना या हद्दीवर गस्त घालण्यासाठी देण्यात आलेल्या सातही बोटी नादुरूस्त अवस्थेत
Navi Mumbai
Navi MumbaiSaam Tv

Navi Mumbai: नवी मुंबई: मुंबईसह नवी मुंबई शहराला बराच सागरी किनारा लाभला आहे. नवी मुंबईचा विचार करता 144 किमीची सागरी हद्द शहराला आहे. पण, याच हद्दीची सुरक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून राम भरोसे पडली आहे. कारण, पोलिसांना नवी मुंबई पोलीस या हद्दीवर गस्त घालण्यासाठी देण्यात आलेल्या सातही बोटी नादुरूस्त अवस्थेत असल्याने सागरात गस्त घालायची कशी? असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांना पडला आहे (Is Navi Mumbai Maritime Security System In Danger).

नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस 2 खाजगी बोटींनी पेट्रोलिंग करत आहे. 3 बोटीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे नवी मुंबई पोलीस आयुक्त सांगतात.

Navi Mumbai
Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अडीच कोटीचे ड्रग्ज जप्त

मुंबईत 26/11 चा महाभयानक दहशतवादी हल्ला हा समुद्रामार्गेच झाला होता. समुद्रातून दहशतवादी मुंबईत आले होते. त्यानंतर 2016 साली उरण परिसरातही दहशतवादी घुसल्याच्या माहितीवरून मिलेट्री फोर्सेस तैणात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे समुद्रातून कोणीही, कधीही येण्याची शक्यता असूनही याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सागरी किनाऱ्याला लागून जेएनपीटी बंदर, घारापुरी बेल्ट, भाभा अनुसंधान केंद्र असे संवेदनशील प्रकल्प असतानाही सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सगळ्यासह खाडीलगतच्या भागात वाळू तस्करी, डिझेल तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, गस्त घालायला पोलिसांकडे बोटीच नसल्याने आरोपींना याचा फायदाच होत आहे.

Navi Mumbai
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत विधान परिषदेत सुरेश धस उठवणार आवाज !

दरम्यान अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासह कोणतातरी मोठा गुन्हा घडण्याआधी प्रशासनाने पोलिसांना योग्य साहित्य पुरवून सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करुन मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com