Raj Thackeray : दगडफेक प्रकरणात राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या; वाचा न्यायालयाचा निकाल

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ठाकरे यांची प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती अमान्य केली.
Raj Thackeray, islampur court rejects raj thackeray's discharge plea in 2008 case.
Raj Thackeray, islampur court rejects raj thackeray's discharge plea in 2008 case.saam tv

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना परळी (parli) बीड (beed) येथे काही दिवसांपुर्वी न्यायालयात दिलासा मिळाला हाेता. दुसरीकडे शुक्रवारी सांगली जिल्ह्यात मात्र अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयातील (court) निकालावरुन मनसैनिकांसह (mns) राज ठाकरेंना झटका बसला आहे.

Raj Thackeray, islampur court rejects raj thackeray's discharge plea in 2008 case.
Pune Bangalore National Highway : कराड - मलकापूर उड्डाणपूल पाडणार; जाणून घ्या वाहतुक मार्गातील बदल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दाखल केलेला दोषमुक्ती अर्ज इस्लामपूर न्यायालयात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. हा अर्ज नामंजूर झाल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. (Maharashtra News)

Raj Thackeray, islampur court rejects raj thackeray's discharge plea in 2008 case.
Karad : नऊ लाखांची फसवणूक झाल्याने क-हाडातील युवकाची आत्महत्या; स्टेटसची गावात चर्चा

शिराळा (Shirala) तालुक्यातील शेंडगेवाडी येथे २००८ मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. यावेळी दगडफेकही (stone pelting) झाली. सरकार पक्षाच्यावतीने याप्रकरणी ठाकरे, मनसे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत (tanaji sawant) व अन्य यांच्याविरुध्द कोकरुड पोलीस (kokrud police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिराळा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Raj Thackeray, islampur court rejects raj thackeray's discharge plea in 2008 case.
Raj Thackeray Parli News : राजप्रेमींचा भाजप, एनसीपीच्या बालेकिल्ल्यात धुडगूस; उत्साहाच्या भरात...

राज ठाकरे यांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्याची विनंती वकिलामार्फत इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. सरकारी वकिल राजेश पाटील यांनी युक्तीवाद करीत असताना अद्याप साक्षीदारांचे जबाब नोंदविले नाहीत असे सांगत दोषमुक्तीला विरोध दर्शवला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ठाकरे यांची प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती अमान्य केली. या निर्णयाने मनसैनिकांना (Maharashtra Navnirman Sena) धक्का बसला आहे. आता आगामी काळात राज ठाकरेंना या प्रकरणातून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com