
Islampur News : यापुढे कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा कुणाचाही बंद (Bandh) असला तरी व्यापारी त्या बंदमध्ये फक्त बारा वाजेपर्यंतच सहभागी होतील. त्यानंतर व्यापारी आपापले व्यवसाय सुरू करतील असा महत्त्वपूर्ण निर्णय इस्लामपूर (islampur) येथील व्यापारी महासंघाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती नागरिकांनी व्हावी यासाठी महासंघाने शहरात फलक लावले आहेत.
उठ की सुठ कुणीही बंद पुकारते आणि त्यामुळे व्यापारी वर्ग वेठीस धरला जातो .नागरिकांचीही गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन व्यापारी महासंघाने नुकताच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत ही भूमिका जाहीर केली.
गांधी चौक आणि बस स्थानक परिसरात या निर्णयाचे फलक झळकले. महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील म्हणाले, "बंद पुकारणारे लोक वैयक्तिक फायद्यासाठी व्यापाऱ्यांना गृहीत धरतात. व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान आणि ग्राहकांची गैरसोय विचारात घेतली जात नाही.
कोरोना (corona) संसर्गामुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. त्यातून अद्याप सावरणे जमले नसताना कुणी ना कुणी सतत त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बंद पुकारत असतात. आम्हांला त्यांच्या विषयाशी, मागण्यांशी देणेघेणे नाही, आम्ही त्यांच्या सोबत राहू; परंतु फक्त बारा वाजेपर्यंत त्यांच्या बंदमध्ये सहभागी होऊ असेही पाटील यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले दुपारी बारानंतर व्यवसाय (business) सुरू केले जातील. त्यानंतर कुणाची दादागिरी सहन केली जाणार नाही. तशी कुणी अरेरावी केल्यास व्यापारी संघटितपणे ते मोडून काढतील असे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.