दारू गावात आणल्यास पोलिसात तक्रार देऊ; ग्रामपंचायतीचा इशारा

दारू गावात आणल्यास पोलिसात तक्रार देऊ;  ग्रामपंचायतीचा इशारा
illegal liqour

बुलढाणा : ग्रामपंचायतीने ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित करुन देखील गावात देशी दारूची विक्री सुरु असल्याची तक्रार सातत्याने सरपंचांच्या कानावर येत हाेती. अखेरीस सरपंचांच्या पतीने गावात बेकायदेशीर रित्या सुरु असलेली दारु विक्री राेखण्याचा निर्धार केला. त्याूतन त्यांनी देशी दारूचे बॉक्स पकडून ते पेटवून दिले. ही घटना चिखली तालुक्यातील इसरुळ गावात नुकतीच घडली. isrul-chikhali-sarpanch-took-action-on-illegal-liquor-sale-buldhana-news

illegal liqour
...तर भाजपला ते सहन होत नाही : जयंत पाटील

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या चिखली तालुक्यातील ईसरूळ या गावचे सरपंच मीनाताई संतोष भुतेकर यांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला होता. परंतु तरीही गावात दारु विक्री सुरु असल्याचे ग्रामपंचयातीत तक्रारी येऊन लागल्या.

हे सातत्याने कानावर पडू लागल्याने बेकायदेशीरित्या दररोज दुचाकीवरुन देशी दारू आणली जात असल्याची माहिती काढण्यात आली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरपंच यांच्या पतीने गावाच्या बाहेर देशी दारू घेऊन येणारी दुचाकी अडविली. त्यांनी स्वतः देशी दारूचे बॉक्स फोडून टाकले. त्यानंतर पेटवून दिले. या पुढं कोणीही देशी दारू गावात घेऊन येऊ नये अन्यथा पोलिसात तक्रार देऊन कारवाई केली जाईल असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.