ST कर्मचाऱ्यांना राज्यसेवेत घेणं सोपं नाही; संघटनांनी आडमुठेपणा सोडावा - शरद पवार

राज्यात खूप महामंडळे (Corporations) आहेत. त्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. एकाला सेवेत घेऊन दुसऱ्याला दुखावणे योग्य नाही.
ST/ शरद पवार
ST/ शरद पवारSaamTV

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज गडचिरोली (Gadchiroli) येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यासह देशातील अनेक महत्वाच्या मुद्यांवरती भाष्य केलं आहे. राज्यातील दिवसेंदिवस जास्तच चिघळत चालेल्या ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरती (ST workers' agitation) पवारांनी महत्वाच विधान केलं आहे. (It is not easy to hire ST employees in the state service)

हे देखील पहा -

पवार म्हणाले 'राज्यात ST कर्मचाऱ्यांना राज्यसेवेत घेणं सोपं नाही. राज्यात खूप महामंडळे (Corporations) आहेत. त्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. एकाला सेवेत घेऊन दुसऱ्याला दुखावणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले याचा अर्थ सध्या तरी एसटीचे विलीनीकरण (ST merger) शक्य नसल्याचे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सुचवलं आहे. शिवाय त्यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन देखील केलं.

ST/ शरद पवार
ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले

तसेच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत सरकारने संवादातून मार्ग काढावा, अशीही सूचना त्यांनी केली. प्रसंगी आम्ही मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विलिनीकरण अशक्य असल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले. ST कर्मचारी संघटनांनी (ST Staff Union) आडमुठेपणाचा मार्ग सोडावा, असे आवाहन करत सरकारशी चर्चा करताना मान्यताप्राप्त संघटनांशी चर्चा करता येते; मात्र जमावाशी नाही, हे त्यांनी लक्षात आणून दिले.

केंद्राने तयारी दाखवली तरच चर्चा -

पंजाब, हरयाणा, पश्चिम यूपी दिल्लीचे शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्राने चर्चा करण्याची गरज आहे. कायदा दुरुस्त (Amend the Law) करायला जिथे वाव आहे, तिथे ती तयारी दाखवली पाहिजे. त्यानंतर चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते असं मत त्यांनी देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावरती व्यक्त केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com