फडणवीसांच्या काळातच गुजरातला पाणी पळवलं, आता वेदांताही पळवला; नाना पटोलेंचा हल्लाबोल

कोणाला कुठे दौरे करायचे हा त्यांचा अधिकार, पण विदर्भात काँग्रेसच राहणार... - पटोले
Nana Patole Vs Devendra Fadnavis
Nana Patole Vs Devendra FadnavisSaam TV

तबरेज शेख -

नाशिक: वेदांतासारखे उद्योग ईडी सरकारने हे गुजरातला पाठवले, महाराष्ट्राची लुट करून गुजरातला (Gujrat) पाठवतायत २०१४ ते २०१९ ला जेव्हा स्वतः फडणवीस मुख्यमंत्री असताना आमचे पाणी गुजरातला पळवले आणि आता वेदांता (Vedanta) देखील यांच्या काळातच गेला असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात ईडीचे सरकार आल्यापासून ओबीसी (OBC) मुलांची स्कॉलरशिप थांबवली, राज्यात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मात्र, यांना देवाची पण भिती राहिली नाही. अनंत चतुर्दशीला घोषणा करतात पण अजून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

नाना पटोलेंच्या पत्रकार परिषदेत त्यांना दसरा मेळाव्यासाठी बिकेसीने शिंदे गटचा अर्ज स्वीकारला आणि ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला, त्यामुळे आता या मैदानात शिंदे गटाला परवानगी मिळण्याची दाड शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आम्हाला दसरा मेळावा वादात आम्हाला पडायचे नाही असं म्हणत या प्रकरणावर बोलायचं टाळलं.

तसंच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्र्याना आम्ही आणि जनतेनं किती सिरीयस घ्यायचं असा सवाल उपस्थित केला. आमचं मत जर फडणवीसांना गंभीर्याने घ्यायचे नसेल तर, राहुल गांधींच्या पदयात्रेला हे घाबरले का? यांचे सरकार लोकशाही विरोधी असल्याचंही पटोले म्हणाले.

Nana Patole Vs Devendra Fadnavis
Baramati: भाजपला पराभव दिसतोय म्हणूनच निवडणुका लांबणीवर; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

पत्रकारांनी राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर पटोले म्हणाले, कोणाला कुठे दौरे करायचे हा त्यांचा अधिकार आहे. पण विदर्भात काँग्रेसच राहणार दरम्यान, यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर बोलायचं टाळलं, आम्हाला ओबीसी आणि मराठाच्या वादात पडायचे नाही. असं ते म्हणाले. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर लढण्याची आमची तयारी असून याबाबतीत कार्यकर्त्यांची मतं महत्वाची असल्याचंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com