मुक्‍ताई पालखीचे पहाटे चारला होणार पंढरपूरला प्रस्‍थान

मुक्‍ताई पालखीचे पहाटे चारला होणार पंढरपूरला प्रस्‍थान

मुक्‍ताई पालखीचे पहाटे चारला होणार पंढरपूरला प्रस्‍थान

मुक्ताईनगर (जळगाव) : आषाढी वारीला खूप महत्‍त्‍व मानले जाते. आषाढीनिमित्‍ताने राज्‍यभरातून वेगवेगळ्या पालख्‍या पंढरपूरात दाखल होत असतात. यात संत मुक्‍ताई पालखीचा देखील समावेश आहे. मात्र पायी वारीला बंदी असून, पालखी बसने पंढरपूरात पोहचणार आहे. त्‍यानुसार संत मुक्‍ताई पालखीचे उद्या (ता.१९) पहाटे चारला बसने पंढरपूरकडे प्रस्‍थान होणार आहे. (jalgaon-aashadhi-ekadashi-pandharpur-wari-sant-muktai-palakhi-going-mornig)

अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील संत मुक्ताई पालखीचे मोठ महत्व आहे. आषाढी एकदशीनिमित्‍त राज्यातून पहिला मान हा या पालखीला दिला जात असतो ३१२ वर्षाची पंढरपूरकडे पालखी नेण्याची परंपरा आहे. हजारोच्या संख्येने वारकरी मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावाने यामध्‍ये सहभागी होत असतात. यंदा मात्र कोरोनच्या पार्श्वभूमीवर पायी वारी नेण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातल्याने पालखी बसने पंढरपूरकडे नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे १९ जुलैला सकाळी चार वाजता मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. बसमधून चाळीस वारकऱ्यांना परवानगी दिली असल्याने या सर्व वारकऱ्यांच्या नावाची यादी आणि त्यांच्या कोरोना संदर्भात कराव्या लागणाऱ्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

मुक्‍ताई पालखीचे पहाटे चारला होणार पंढरपूरला प्रस्‍थान
तेलाचे तळे साचले अन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅन

गावांचा दाखविला जातोय नैवेद्य

पायी वारी निघत असताना पालखीचा मुक्काम अनेक गावात होत असतो. या प्रत्येक गावात पालखीसाठी महाप्रसाद म्‍हणून वेगवेगळ्या प्रसाद दाखविला जातो. ही परंपरा खंडित होऊ नये; यासाठी त्या गावच्या महाप्रसादप्रमाणे मुक्ताईनगरमधील नवीन मंदिर परिसरात पालखी विराजमान असलेल्या ठिकाणी नैवेद्य दाखविला जात आहे. या शिवाय शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे अभिषेक, काकड आरती, होम हवन आणि पूजन केले जात आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com