Accident News: कारची दुचाकीला धडक; दोन युवक ठार, एक जखमी

कारची दुचाकीला धडक; दोन युवक ठार, एक जखमी
Accident News
Accident NewsSaam tv

एरंडोल (जळगाव) : जळगावकडून नाशिक येथे भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीला समोरून धडक (Accident) दिली. यात शेतातून घराकडे जाणारे दोन युवक जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीस जळगाव (Jalgaon) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Letest Marathi News)

कार व दुचाकीचा अपघात सोमवारी (१६ जानेवारी) सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय महार्गावरील पिंपळकोठा गावाजवळ झाला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातानंतर कार चालक व अन्य दोन जणांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी कारचालक व अन्य दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

Accident News
Raj Thackeary News : राज ठाकरेंना दिलासा, 'या' अटीवर अजामीनपात्र वाॅरंट रद्द

दोन्‍ही जागीच ठार

नितीन जामसिंग पाटील (वय २५), घनश्याम भानुदास बडगुजर हे दोन युवक दुचाकीने घरी जात होते. तर नारायण धनसिंग पाटील (वय २४) हा युवक रस्त्याच्या कडेने पायी शेतात जात होता. पिंपळकोठ्याजवळील नाल्याजवळ जळगावकडून नाशिककडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. कारने धडक दिल्यामुळे दुचाकीचे अक्षरश: तुकडे झाले आणि दुचाकीवरील नितीन पाटील व घनश्याम बडगुजर (दोन्ही रा. पिंपळकोठा) हे दोन युवक जागीच ठार झाले. तर रस्त्याच्या कडेने शेतात पायी जाणारे नारायण पाटील हे गंभीर झाले.

जखमी नारायणचा ३१ ला विवाह

अपघातानंतर जोरदार आवाज झाल्यामुळे पिंपळकोठा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन मदतकार्य सुरू करून जखमीस जळगाव येथे रवाना केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अपघातात मृत झालेले दोन्ही युवक अविवाहित होते. तर गंभीर जखमी असलेला नारायण पाटील याचा ३१ तारखेला विवाह आहे. याबाबत गजानन बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मर्सिडीज कारचालाकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com