गुरांना वाचविताना झाला घात; कार झाडावर आदळून तीघांचा जागीच मृत्यू

गुरांना वाचविताना झाला घात; कार झाडावर आदळून तीघांचा जागीच मृत्यू
गुरांना वाचविताना झाला घात; कार झाडावर आदळून तीघांचा जागीच मृत्यू
AccidentSaam tv

भडगाव (जळगाव) : तालुक्यातील पळासखेड्याजवळ भरधाव जाणारी कार समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात निंबाच्या झाडावर आदळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. या बाबत भडगाव (Bhadgaon) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon accident news car crashed into a tree death three on the spot)

Accident
धक्कादायक! अकोल्यातील दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू

पळासखेडा येथून होंडाई कारने तिघे तरवाडे गावाकडे भरधाव वेगात (Accident) जाताना रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना वाहनाचा वेगाचा अंदाज न आल्याने ही कार रस्त्याच्या बाजूस असलेले निंबाच्या झाडावर आदळली. यात कारमधील किसन लखीचंद जाधव (वय ४०, रा. गाळण, ता. पाचोरा), पवन इंदल राठोड (वय २६, रा. गाळण, ह. मु. टिटवाळा, ता. कल्याण), जितेंद्र काशिनाथ पवार (रा. ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे) या तिघांच्या डोक्यास व हातापायाला जबर मार लागला.

रुग्णालयात जाण्यापुर्वी मृत्‍यू

त्यांना तत्काळ ग्रामीण (Hospital) रुग्णालय, भडगाव येथे दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या बाबत सुनील वसंतराव राठोड (रा. गाळण, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.