ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 मजुराचा जागीच मृत्यू

जळगावात भीषण अपघात (Jalgaon) झाला आहे
ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 मजुराचा जागीच मृत्यू
Accident Jalgaon NewsSaam Tv

जळगाव: जळगावात एक भीषण अपघात (Jalgaon) झाला आहे. रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध (Tanker) टाकत होते. अचानक भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ ४ ते ५ वाहनांनी टँकरला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) ५ जण जागीच ठार (killed) झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे.

हे देखील पाहा-

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून २ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर (National Highways) रात्री धुळ्याहून दूध घेऊन निघालेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलाविण्यात आला होता. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले होते. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती. दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्याच्या मागोमाग २ कारने अशा ४ ते ५ भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला जोरात धडक दिली.

Accident Jalgaon News
रायपूरमध्ये मोठी दुर्घटना, हेलिकॉप्टर क्रॅश होऊन 2 पायलटचा मृत्यू!

यामध्ये बंद पडलेल्या टँकरमधील ३ जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान अद्यापपर्यंत मयतांची नावे कळू शकली नाहीत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.