Amalner News: मंगळग्रह मंदिरावर आता हेलीकॉप्टरही उतरणार

मंगळग्रह मंदिरावर आता हेलीकॉप्टरही उतरणार
Amalner News Mangal Temple
Amalner News Mangal TempleSaam tv

जळगाव : शासनाच्या पर्यटन विभागातर्फे देशातील दुर्मीळ असलेल्या (Jalgaon News) जळगावातील अमळनेर (Amalner) मंगळग्रह सेवा संस्थेला विविध विकास कामांसाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातूनच मंदिर परिसरातील जागेत हेलिपॅड, कार पार्किंग, सोलर सिस्टिम, कॅफेटेरियाच्या जागेचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (Live Marathi News)

Amalner News Mangal Temple
Jalna News: मुलीचा खूनी बाहेरच; वडिलांनी पोलिस स्‍टेशनसमोरच अंगावर ओतले पेट्रोल

देशातील एकमेव असलेल्‍या मंगळग्रह मंदिरात पर्यटन विकास विभागाकडून निधी मिळाला आहे. यातून विविध विकास कामे केली जात आहेत. या कामांचे भूमीपूजन नारळ वाढवून विधिवत मंत्रोपच्चारात करण्यात आले. स्वत:च्या मालकीचे हेलीपॅड असलेले अमळनेर मंगळग्रह मंदिर हे राज्यातील एकमेव तीर्थ क्षेत्र असल्याचा दावा मंदिर संस्थानकडून करण्यात आला आहे. कार्यक्रमाला खासदार उन्मेश पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, मंगळग्रह मंदिर संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Amalner News Mangal Temple
Electric Bus: आता नंदूरबार जिल्ह्यातही धावणार इलेक्ट्रीक बस

कार पार्किंगच्या छतावर असणार सोलर पॅनल

श्री मंगळ ग्रह मंदिर अनेक बाबतीत एकमेवाद्वितीय आहे. त्यात आणखी एका बाबीची भर पडली आहे. ती म्हणजे स्वतःच्या मालकीचे हेलिपॅड असलेले हे आता राज्यातील एकमेव मंदिर ठरले आहे. तसेच अत्यंत देखण्या असलेल्या कार पार्किंगच्या छतावर सोलर पॅनल असलेलेही हे एकमेव मंदिर ठरले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com