Jalgaon News : सैन्यदल भरतीत अपयश; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Chalisgaon News : सैन्यदलाच्या भरतीत अपयश; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

मेहुणबारे (जळगाव) : सैन्यदलात भरती होण्याचे उराशी स्वप्न होते. यामुळे अनेक दिवसांपासून सर्व सुरु होता. परंतु (Jalgaon) प्रयत्न करूनही अपयश येत असल्याने नैराशेत गेलेल्या २१ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना (Chalisgaon) देवळी (ता. चाळीसगाव) येथे बुधवारी (ता. १३) उघडकीस आली. (Live Marathi News)

Jalgaon News
Jalgaon News : एकाच दिवशी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; कर्जबाजारीपणाचे ठरले कारण

देवळी (ता. चाळीसगाव) येथील राज अशोक पाटील (वय २१) हा सैन्यदलात भरती होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करीत होता. मात्र, अपयश येत असल्याने तो नैराश्यग्रस्त झाला होता. दरम्यान मंगळवारी (१२ सप्टेंबर) राजने कुटुंबीयांसोबत जेवण केले. रात्री अकराच्या सुमारास तो घराच्या वरच्या मजल्यावर खोलीत झोपण्यासाठी गेला. 

Jalgaon News
Ganpat Gaikwad News : नाना पाटेकरांच्या वक्तव्याचे गणपत गायकवाडांकडून समर्थन; महापालिकेवर केला भ्रष्टाचाराचा आरोप

सकाळी वडील उठवायला गेले असता.. 

दरम्यान सकाळी सहाला राजचे वडील अशोक पाटील हे गुरांचे दूध काढण्यासाठी उठविण्यासाठी गेले असता, त्याने छताला असलेल्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकार कुटुंबीयांना समजताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्या मदतीने राजचा मृतदेह विच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. सैन्यदलाच्या भरतीत अपयश आल्याने त्याने जीवन संपविल्याची चर्चा गावात होती. या प्रकरणी स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com