त्‍या घटनेने अंध वडीलांचा आधार हिरावला; बंधाऱ्यात बैलगाडी उलटली

त्‍या घटनेने अंध वडीलांचा आधार हिरावला; बंधाऱ्यात बैलगाडी उलटली
त्‍या घटनेने अंध वडीलांचा आधार हिरावला; बंधाऱ्यात बैलगाडी उलटली
death

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बैलगाडीने धाब्यावर टाकण्यासाठी खारी माती घेऊन घराकडे येत असताना सतारी नाल्याच्या बंधाऱ्यात बैलाचा पाय सटकल्याने बैलगाडी उलटून दोघे आतेभाऊ व मामेभाऊ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सायगाव (ता. चाळीसगाव) येथे घडली. घटनेनंतर सायगाव गावावर शोककळा पसरली आहे. jalgaon-chalisgaon-news-two-brother-water-drowned-and-death

सायगाव येथील राकेश चिला अहिरे (वय १९), सुकदेव जगन जाधव (१८) हे दोघेही आतेभाऊ-मामेभाऊ सायगाव-नादगाव रस्त्यालगत असलेल्या सतारी शिवारात दुपारी चारच्या सुमारास बैलगाडीने धाब्यावर टाकण्यासाठी लागणारी खारी माती घेण्यासाठी गेले होते.

चटका लावणारा मृत्यू

राकेश व सुकदेव हे दोघेही खारी मातीची बैलगाडी भरून सतारी नाल्याच्या बंधाराच्या पाण्यातून घरी येत असताना बैलाचा पाय पाण्यात सटकला व बैलगाडी पाण्यात उलटली. बैलगाडीवर बसलेले दोघेही पाण्यात पडले. त्या ठिकाणी शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीने त्यांना पाहिले. त्याने लगेच गावात भ्रमणध्वनीवर कळविले व दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने चाळीसगावला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या दोघांचे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सतीश महाजन यांनी दिलेल्या माहीतीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

death
नांदेड जिल्ह्यातील क्राईम फोकस वाचा एका क्लिकवर

अंध वडिलांचा आधार गेला

राकेश पिलखोड येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत होता. आई- वडिलांना तो एकुलता एक असून, त्याचे वडील अंध आहेत. दुसरा सुकदेव व राकेश दोघे आतेभाऊ मामेभाऊ होते. या दोघांचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. हे दृश्‍य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या दोघांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com