जळगाव जिल्‍ह्याला दिलासा..आणखी एक तालुका कोरोनामुक्त

जळगाव जिल्‍ह्याला दिलासा..आणखी एक तालुका कोरोनामुक्त
जळगाव जिल्‍ह्याला दिलासा..आणखी एक तालुका कोरोनामुक्त
corona free

एरंडोल (जळगाव) : जळगाव जिल्‍ह्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. रोज संक्रमित होणाऱ्या रूग्णांची संख्‍या देखील कमी झाली असून, ॲक्‍टीव रूग्णांची संख्‍या कमी झाली आहे. यापुर्वी बोदवड तालुका कोरोनामुळे झाला असून आता एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे एरंडोल तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तालुक्यातून कोरोना हद्दपार झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (jalgaon-corona-update-Jalgaon-district-erandol-taluka-is-free-from-corona)

देशात कोरोनाचे संकट वाढल्यामुळे तालुक्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. तालुक्यात ६ हजार ७०८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. ६ हजार ४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २३१ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. सद्यस्थितीत तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यामुळे तालुक्याने कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे.

तरीही सावधानता आवश्‍यक

तालुका कोरोनामुक्त झाला असला तरी आगामी काळात येणारी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. शहरासह ग्रामीण भागात मार्च, एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रांताधिकारी विनय गोसावी, मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, डॉ. कैलास पाटील, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी योग्य ते नियोजन करून नागरिकांना दिलासा दिला होता. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तींची बैठक घेवून ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी प्रांताधिकारी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आर्थिक मदत केली होती.

corona free
व्‍हॉट अ आयडीया..सायकलचे ब्रेक, मोटारसायकलचे ॲक्‍सीलेटर अन्‌ चारचाकीची निर्मिती

एकमेकांच्‍या साथीने शक्‍य

कोरोनामुळे कडक लॉकडाऊन असल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे रोजगार बंद झाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. शहरातील विविध सामाजिक संघटना, दानशूर नागरिकांनी गोरगरीब नागरिक, आदिवासी बांधवांना जिवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन त्यांना दिलासा देण्याचे काम केले होते. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केल्‍यामुळे तसेच नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन केल्यामुळे तालुक्यातून कोरोना हद्दपार झाला आहे.

धोका कायम

तालुका कोरोनामुक्त झाला असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. संभाव्य तिसरी लाट येण्याची भीती असल्यामुळे नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन करून कोरोनाची तिसरी लाट तालुकाय्त येणार नाही; यासाठी प्रशासनातर्फे केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com