Jalgaon: अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेलिंग; पीडितेकडून मागितली खंडणी

अश्लील फोटो टाकून ब्लॅकमेलिंग; पीडितेकडून मागितली खंडणी
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने व्हॉट्‌सॲपवर अश्लील मॅसेज पाठवून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी (Jalgaon) जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon Crime News)

जळगाव शहरात रामानंदनगर पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत २२ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. ८ ते १६ जुलै असे आठ दिवस पीडितेच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर तिचे फोटो एडिट करून सोबत इतरांचे अश्लील फोटो पाठवत विनयभंग केला. तिचे फोटो सोशल मीडियात (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. तरुणीने तातडीने जळगाव सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com