Jalgaon Crime News: भरदिवसा सिनेस्टाईल लुटले; डोळ्यात मिरचीपुड टाकून अडीच लाख लंपास

भरदिवसा सिनेस्टाईल लुटले; डोळ्यात मिरचीपुड टाकून अडीच लाख लंपास
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

जळगाव : जळगावच्या मेहरुणमधुन अमळनेरकडे दुचाकीने जाणाऱ्या बांधकाम ठेकेदाराकडून अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाईल लुटले. अडीच लाखांची लुट केल्याची घटना म्हसले (ता. अमळनेर) गावी दुपारी घडली. बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी (३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) असे (Jalgaon) बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पाठीत चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. (Latest Marathi News)

Jalgaon Crime News
Dhule Crime News: दिरानं मर्यादा ओलांडली; भावजयीवरअत्याचार करत पेट्रोल टाकून पेटवले; मध्‍यरात्रीच्‍या घटनेने खळबळ

राजेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून अमळनेर (Amalner) जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यांच्यासोबत एका जागेच्या व्यवहारासाठी नेत असलेली अडीच लाखांची रोकड होती. धरणगाव ओलांडल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील सहा जणांनी त्यांना अडवले. काही कळण्याच्या आतच सूर्यवंशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पाठीत चाकूने तीन वार केले. यानंतर त्यांच्याकडील अडीच (Crime News) लाख रुपये व दुचाकी हिसकावून चोरटे अमळनेरच्या दिशेने पसार झाले.

Jalgaon Crime News
Samruddhi Mahamarg Accident: भीषण अपघात..एकाच कुटुंबातील ४ भावंडांचा मृत्यू; अंत्‍यविधीवरून परतताना काळाची झडप

जखमी अवस्‍थेतच गावाकडे निघाले

सूर्यवंशी हे जखमी अवस्थेत म्हसले गावाकडे निघाले. त्याचवेळी (Dharangaon) धरणगाव येथील तीन तरुण दुचाकीने येत होते. त्यांनी जखमी सूर्यवंशी यांना पाहिले आणि धरणगाव पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती केली. पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी घटनास्थळ गाठून जखमीस रुग्णालयात रवाना केले. तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस (Police) अधीक्षक कृषिकेश रावले यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com