
जळगाव : बँकतून बोलत आहे, तुमच्या कार्डवर व्यवहार सुरु असून तुम्हाला महिन्याला ४९ हजाराचा भुर्दंड सोसावा लागेल. अन्यथा तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारुन एका डॉक्टराला ४९ हजाराची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) केल्याची घटना समोर आली आहे. (jalgaon cyber crime Fraud of a doctor for fear of losing money)
जळगाव (Jalgaon) शहरातील जोशी पेठेतील जेष्ठ डॉ. अलिम अहमद (वय ५२) वास्तव्यास आहेत. वैद्यकीय सेवा देवून आपला उदरनिर्वाह करतात. १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांना ८११४१७५१७३ क्रमांकावरून अनोळखी महिलेचा फोन आला.
बोलत विचारला ओटीपी
आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्या बँक खात्यातून ट्रॅन्झॅक्शन होत आहे. ते बंद करावे लागेल. तुम्ही बंद करणार नाही; तर दर महिन्याला तुमच्या खात्यातून ४९ हजार ३१२ रूपयांचा अतिरीक्त भुर्दंड तुम्हाला सोसावा लागेल. असे सांगून डॉक्टरला ओटीपी नंबर बोलण्यात फसवणूक (Cyber Crime) करून विचारून घेतला. त्यानंतर लागलीच डॉक्टरच्या खात्यातून ४९ हजार ६१२ रूपये कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.