ऑनलाईन मुलाखत पडली महागात; लिंक ओपन करताच बँक खात्‍यातून रक्‍कम गायब

ऑनलाईन मुलाखत पडली महागात; लिंक ओपन करताच बँक खात्‍यातून रक्‍कम गायब
Cyber Crime Latest Marathi News, Jalgaon Latest Marathi News
Cyber Crime Latest Marathi News, Jalgaon Latest Marathi NewsSaam tv

जळगाव : नोकरीच्‍या शोधत असलेल्‍या तरूणाला गाठत त्‍याच्‍याशी संपर्क करून ऑनलाईन मुलाखत द्या; असे सांगितले. तसेच त्‍यासाठीची लिंक पाठविली असता लिंकवर क्लिक करताच तरूणाच्या बँक (Bank) खात्यातून १७ हजार ६०० रूपये काढून नेल्याचे उघडकीला आले. (jalgaon cyber crime Online interviews Money disappears from the bank account)

Cyber Crime Latest Marathi News, Jalgaon Latest Marathi News
रेल्वेखाली गृहस्थाची आत्महत्‍या; आईच्‍या मृत्‍यूनंतर होते नैराशेत

पाचोरा (Pachora) येथील शिवाजीनगर परिसरातील सोहन अशोक मोरे (वय २४) हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोहन यास २ मे रोजी दुपारी अनोळखी (Cyber Crime) नंबरवरून फोन आला. नोकरीसाठी ऑनलाईन मुलाखत द्या; असे सांगितले. यानंतर समोरील नंबरवरून महिलेने एक लिंक पाठवत पेपर सोडविण्यास सांगितले. (Cyber Crime Latest Marathi News)

पेपर सोडवित असताना रक्‍कम गायब

सदर तरूण दिलेली लिंक ओपन करून पेपर सोडवित असतांना त्याच्या बँक खात्यातून एकुण १७ हजार ६०० रूपये परस्पर वर्ग करून फसवणूक केल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निवृत्ती मोरे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com