जळगाव जिल्ह्यात वाजली शाळांची घंटा; ३०६ गावातील शाळांमध्‍ये भरले वर्ग

जळगाव जिल्ह्यात वाजली शाळांची घंटा; ३०६ गावातील शाळांमध्‍ये भरले वर्ग
जळगाव जिल्ह्यात वाजली शाळांची घंटा; ३०६ गावातील शाळांमध्‍ये भरले वर्ग
Jalgaon school openJalgaon school open

जळगाव : शासन निर्णयानुसार जळगाव जिल्‍ह्यातील माध्‍यमिक विभागाच्‍या शाळा सुरू झाल्‍या आहेत. ग्रामीण भागातील ७०८ शाळांपैकी ३०६ गावांकडून शाळा सुरू करण्याबाबत ठराव प्राप्‍त होते. त्‍यानुसार आज प्रत्‍यक्षात ३०६ शाळांमध्‍ये वर्ग भरले होते. (jalgaon-district-306-school-open-today-after-coronavirus)

शासनाने १५ जुलैपासून राज्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संबंधित गावांमधील ग्रामपंचायतींनी ठराव करणे आवश्यक होता. जिल्ह्यात ७०८ माध्यमिक शाळा असलेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन केले होते. त्यापैकी काही शाळांबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव केले असल्याने आज शाळा सुरू झाल्या.

Jalgaon school open
नंदुरबारात विद्यार्थ्यांमध्‍ये उत्‍साह; नियम पाळत वर्ग सुरू

३०६ शाळांची घंटा वाजली

माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी माध्यमिक शाळांना ग्रामपंचायतींचा ठराव आवश्यक होता. जिल्ह्यातील ७०८ शाळा सुरू करण्यासाठी संबंधित शाळांना सुचना दिल्या होत्‍या. मात्र शासन निर्देशानुसार ग्रा.पं.चे ठराव घेण्यानुसार केवळ ३०६ ग्रामपंचायतींचे ठराव प्राप्‍त होते. यामुळे आज कोरोना नियमांचे पालन करत प्रत्‍यक्षात ३०६ शाळा भरल्‍या. काही शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित नव्‍हती. पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असून, नंतर हळूहळू विद्यार्थी संख्या वाढेल असे शिक्षकांनी सांगितले.

गेटवर स्‍वागत अन्‌ शिकविणे सुरू

शाळांमध्‍ये विद्यार्थी आल्‍यानंतर कोरोना नियमांचे पालन करत प्रवेश देण्यात आला. तसेच गेटवर विद्याथ्‍र्यांचे स्‍वागत करण्यात आले. यानंतर आठवी ते दहावीच्‍या वर्गांमध्‍ये शिक्षकांनी शिकविण्यास सुरवात केली होती.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com