पाऊस आला पण उशीर झाला..उडीद, मुग, सोयाबीनच्या पेरण्या गेल्या वाया

पाऊस आला पण उशीर झाला..उडीद, मुग, सोयाबीनच्या पेरण्या गेल्या वाया
पाऊस आला पण उशीर झाला..उडीद, मुग, सोयाबीनच्या पेरण्या गेल्या वाया

जळगाव : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरिप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आतापर्यंत पेरलेल्या उडीद, मुग, सोयाबिनच्या पेरण्यापैकी ३० ते ४० टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत. जी पिके वर आली त्यांना शेतकरी चुहा पध्दतीने पाणी देवून पिके वाचवित आहे. यानंतर उडीद, मुग, सोयाबिनच्या पेरण्या होणार नाही. या पिकांसाठी ५ जुलै ही शेवटीच तारीख असते. कोरडवाहू कपाशी पेरण्याचा कालावधी अजून ३०जुलैपर्यंत असल्याने कपाशीचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे येईल अशी अपेक्षा आहे. (jalgaon-district-rain-droped-to-be-late-and-udid-mug-crop-loss)

गेल्या पंधरा ते सतरा दिवसापासून जिलह्यात पावसाने ओढ दिली आहे. नऊ जुलैला पाऊस झाला मात्र ते केवळ जळगाव शहरापुरता मर्यादीत होता. ग्रामीण भागात पाऊसच हवा तसा झाला नाही. आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. मात्र त्याचा फारसा जेार नव्हता. तीन चार तास झालेल्या पावसाने महामार्ग व रस्ते ओले झाले. रस्त्यावर असलेले खड्डे पाण्याने भरले. मात्र शेतात मुरण्याएवढा जोरदार पाऊस झाला नाही. सकाळी अकरा नंतर सर्वत्र पावसाने उघडीप दिली होती. अशा स्थितीत पिके टिकतील कशी? ज्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांना पाणी न मिळाल्याने पिके मान टाकू लागली आहे. दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे. जर आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाही तर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भिती आहे.

तुर, कपाशीकडे कल

पावसाच्या ओढीने सोयाबिनच्या पेरण्या वाया गेलयात जमा आहे. आता सोयाबिनच्या पेरण्याची वेळ निघून गेल्याने नवीन पेरण्या होणार नाहीत. ५ जुलै ही उडीद, मुग, सोयाबीन, ज्वारी लावण्याची वेळ असते. ती आता निघून गेल्याने शेतकरी आता बाजरी, तूर, कोरडवाहू कपाशीकडे मोठ्या प्रमाणात वळतील. कोरडवाहू कपाशीत अंतरपीक म्हणून तूर, बाजरी घेता येते.आंतरपिक म्हणून शेतकऱ्यांना ही पिके घ्यावीच लागतील. ३० जुलै ही कोरडवाहू कपाशी लागवडीची वेळ आहे.

पाऊस आला पण उशीर झाला..उडीद, मुग, सोयाबीनच्या पेरण्या गेल्या वाया
कृषिमंत्री दादा भुसेंच्या संवेदनशीलतेचे दर्शन; शेतकऱ्यांना दिले स्टेजवर स्‍थान

तर कपाशीच्या उत्पादनात घट येणार

७० ते ७५ हजार हेक्टरवर बागायती कपाशीच्या पेरण्या झाल्या आहेत. आता कोरडवाहू शेतकरी कपाशीच्या पेरण्या करतील. आगामी काळात पाऊस येईल असे गृहित धरून शेतकरी पेरण्या करतील. मात्र पाऊस न झाल्यास कपाशीच्या उत्पादनातही घटीची शक्यता आहे.

पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, उडीद, मुगाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. दुबार पेरणी करू मात्र त्याचीही मुदत निघून गेली आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हैराण झाला आहे. आता बाजरी, तुर, कपाशीवर पिके घेण्याकडे आमचा कल राहिल.

- किशोर चौधरी, शेतकरी

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com