Jalgaon: ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला यश; भाजपला मात्र धक्‍का

शिंदे गटाला यश; भाजपला मात्र धक्‍का
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam tv

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल व चोपडा तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. यात जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी एकही ग्रामपंचायत भाजपला (BJP) विजय मिळविता आला नाही. यामुळे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना धक्का मानला जात आहे. याउलट (Shiv Sena) शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसला प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविता आला. तर चार ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा राहिला. (Jalgaon Gram Panchayat Election)

Gram Panchayat Election
नंदुरबार जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा तालुक्‍यातील ११ व यावल (Yawal) तालुक्‍यातील २ अशा तेरा ग्रामपंचायतींसाठी मतदानाचा प्रक्रीया पार पडली. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. यात शिवसेना, शिंदे गट व राष्‍ट्रवादीला विजय मिळाला आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेस पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही.

ग्रामपंचायतची पक्षनिहाय निकाल

शिवसेना : ३

शिंदे गट : ३

राष्ट्रवादी : ३

भाजप : ०

काँग्रेस : ०

अपक्ष : ४

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com