भीषण अपघात; उभ्‍या टँकरला ट्रकची धडक, पाच जणांचा जागीच मृत्‍यू

भीषण अपघात; उभ्‍या टँकरला ट्रकची धडक, पाच जणांचा जागीच मृत्‍यू
Accident
AccidentSaam tv

जळगाव : दुध टँकर आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्‍यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यात घोडसगावजवळ घडली आहे. (jalgaon muktainagar accident news Five killed as truck hits tanker)

Accident
पाकिस्तानातील कराचीमध्ये बॉम्बस्फोट, 3 ठार, 13 जण जखमी

पोलिस (Police) सुत्रांनी दिलेल्या माहतीनुसार आज पहाटे चारच्‍या सुमारास ही घटना मुक्ताईनगर मलकापूर रस्त्यावर ही घडली. धुळ्यावरून (Dhule) जळगावकडे (Jalgaon) येत असलेला दुधाचा टँकर रस्त्यात बंद पडला होता. यानंतर नव्याने दुसरा टँकर आणून पहिल्या टँकरमधील दूध भरले जात होते. याकरीता क्रेनचा वापर देखील केला जात होता.

ट्रकची जोरदार धडक

याच वेळी धुळ्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने रस्त्यात बंद पडलेल्या टँकर व क्रेनला जोरदार धडक (Accident) दिली. यात दुध भरणारे पाच जण जागीच ठार झाले आहेत. पाचही मृत हे धुळे जिल्‍ह्यातील असल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com