हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्ण उघडले

हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्ण उघडले
हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्ण उघडले
हतनूर

जळगाव : जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवार रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली असून आज दुपारी चारच्‍या सुमारास १४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. (jalgaon-news-14-gates-of-Hatnur-dam-fully-opened)

वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंत्यांनी सायंकाळपर्यंत पाणी सोडणार असल्याचे सांगितले होते. शिवाय रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग अधिक होऊ शकतो. त्यामुळे तापी नदी व वाघूर नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आणखी दहा दरवाजे उघडणार

हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु असून धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. हतनूर धरण पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीला पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढत आहे. सकाळी धरणाचे ४ दरवाजे पूर्ण तर २ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून यातून २७ हजार ८२८ क्युसेक तर कालव्यातून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु होता. आता धरणाचे १४ दरवाजे उघडले आहेत.

हतनूर
पुराने गावाचा संपर्क तुटला; अन्‌ इकडे आरूषीचा आयुष्‍याशी कायमचा!

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनुर धरण क्षेत्रात आजून पाऊस सुरू असून धरणात आजून पाण्याचा प्रवाह येत आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदीत धरणातून पाण्याचा मोठा विर्सग केला जात आहे. त्यामुळे तापी नदीला पुर येवू शकतो. तसेच नदी पात्रा लगत गावांमधील नागरिकांना इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या तर्फे दिला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com