बापरे..महिलेच्या पोटातून काढला १५ किलोचा गोळा

बापरे..महिलेच्या पोटातून काढला १५ किलोचा गोळा
operation
operationsaam tv

जळगाव : गडखांब (ता. अमळनेर) येथील ४० वर्षीय महिला पोटात अनेक दिवसांपासून पोटात दुखतंय म्हणून समस्या घेऊन आली होती. महिलेची तपासणी केली असता तिच्या पोटात अनावश्यक मांसाचा गोळा वाढत असलेला डॉक्टरांना (Doctor) दिसून आले. तातडीने शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील चक्क १५ किलोचा गोळा बाहेर काढण्यात आल्याने तिला जीवनदान मिळाले. (jalgaon news 15 kg lump was removed from the woman abdomen)

operation
पीएचडीसाठी मार्गदर्शकास देवू केले पन्‍नास हजार; शिक्षक एलसीबीच्‍या ताब्‍यात

कमलबाई रमेश भिल या महिलेच्या पोटात वेदना असह्य होत होत्या. नातेवाईकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) (Jalgaon Medical Collage) येथे उपचारासाठी दाखल केले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात डॉक्टरांनी तपासणी केली असता, तिच्या पोटात अनावश्यक मांसाचा गोळा वाढत असलेला दिसून आला. सर्व तपासणीअंती हा अंडाशयाचा गोळा (Jalgaon News) असल्याचे निदान झाले. यामुळे तिच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला होता.

जीवाला होता धोका

वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. विभागप्रमुख डॉ. बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केली. महिलेच्या पोटातून १५ किलोचा गोळा निघाला. जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून, गर्भाशय देखील काढण्यात आले. यामुळे महिलेचा जीव वाचला. डॉ. बनसोडे यांच्‍यासह डॉ. अनिता ध्रुवे, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. शीतल ताटे, डॉ. राजश्री येसगे यांनी शस्त्रक्रिया केली. बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. अनिल पाटील, डॉ. काजल साळुंखे, डॉ. स्वप्नील इंकणे, इन्चार्ज सिस्टर नीला जोशी, सोनाली पाटील, सीमा राठोड यांच्यासह विजय बागुल, कुणाल कंडारे, कृष्णा पाटील, रवींद्र पवार, किशोर चांगरे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com