हतनूरचे ३६ दरवाजे पुन्‍हा उघडले

हतनूरचे ३६ दरवाजे पुन्‍हा उघडले
Hatnur Dam
Hatnur DamSaam tv

जळगाव : हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाची जलपातळी वाढली. दरम्यान आज सकाळी धरणाचे 36 दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. यामुळे तापी नदी (Tapi River) दुथडी भरुन वाहत आहे. (Jalgaon News Hatnur Dam)

Hatnur Dam
Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच

मागील पंधरा दिवसांपासून (Rain) पावसाची अधून मधून हजेरी सुरू आहे. यामुळे हतनूरच्‍या (Hatnur Dam) जलपातळीत वाढ होत आहे. जल पातळी वाढल्‍याने हतनूर धरणाचे दरवाजे उघडले जात आहे. गेल्‍या आठवड्यात सर्व ४१ दरवाजे उघडले होते. यानंतर पाणलोटक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली. आज सकाळी धरणाचे 36 दरवाजे उघडून तापीपात्रात विसर्ग केला आहे.

तापीला पुन्‍हा पुर

हतनूर धरणातून 89 हजार 947 क्युसेक्स विसर्ग करण्यात आल्याने तापी दुथडी भरुन वाहत आहे. भुसावळ शहरातील तापीला पूर आला असून हतनूर प्रशासनाने तापीनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com