भाविकांविना पिंप्राळानगरी सुनी- सुनी; जागेवरच ओढला रथ

पिंप्राळानगरीत थोत्सवानिमित्त पिंप्राळ्यात यात्रा भरत असते. त्यामुळे विविध प्रकारचे संसारोपयोगी साहित्य, मनोरंजनाची साधने, विविध प्रकारची खेळणी विक्रीची दुकाने येथे पिंप्राळा रिक्षा स्टॉप चौकात थाटलेली असतात.
भाविकांविना पिंप्राळानगरी सुनी- सुनी; जागेवरच ओढला रथ
pimprala rath

जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सव साजरा होत असतो. विठ्ठल नामाचा अखंड गजरात दुमदुमणारी पिंप्राळानगरी यंदाही सुनीसुनीच होती. गतवर्षीप्रमाणे कोरोनामुळे रथोत्‍सव साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आल्‍याने रथाची ग्राम प्रदक्षिणा न होता परंपरा कायम राखण्यासाठी जागेवरच रथ ओढण्यात आला. (jalgaon-news-aashadhi-ekadashi-pimprala-rath-utsav-not-celebreat)

पिंप्राळानगरीत थोत्सवानिमित्त पिंप्राळ्यात यात्रा भरत असते. त्यामुळे विविध प्रकारचे संसारोपयोगी साहित्य, मनोरंजनाची साधने, विविध प्रकारची खेळणी विक्रीची दुकाने येथे पिंप्राळा रिक्षा स्टॉप चौकात थाटलेली असतात. तसेच फराळ तसेच चहा वाटपाचा कार्यक्रम देखील होतो मात्र यंदा हे काहीच होऊ शकले नाही. यामुळे सारे वातावरण चैतन्‍यमय झालेले असते.

pimprala rath
व्‍हॉट अ आयडीया..सायकलचे ब्रेक, मोटारसायकलचे ॲक्‍सीलेटर अन्‌ चारचाकीची निर्मिती

रथाची केवळ सजावट

पिंप्राळ्यातील रथोत्‍सवाला १४५ वर्षांची परंपरा आहे. या रथोत्सवात सलग दुसऱ्या वर्षी खंड पडला. कोरोनामुळे हे उत्‍सव साजरा होवू शकला नाही. दरवर्षी रथोत्सवानिमित्त मंदिर व रथाला रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात येते. यंदा देखील रथाची सजावट केली होती. मुख्‍य म्‍हणजे रथोत्सवानिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी पिंप्राळानगरीत दाखल होत असतात. मात्र यंदा निर्बंधांमुळे भाविक येऊ शकले नाही.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com