विठू नामाच्‍या गजरात संत मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान

विठू नामाच्‍या गजरात संत मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान
विठू नामाच्‍या गजरात संत मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान

जळगाव : आषाढ एकादशीनिमित्‍ताने पंढरपुरात पायी दिंडीने जाण्यास बंदी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे हे वारकरींना पायी दिंडीस परवानगी नाही. यामुळे राज्‍यभरातून पालखी या बसने रवाना होत आहे. त्‍यानुसार आज मुक्‍ताईनगर येथील श्री संत मुक्‍ताबाई पालखीचे आज पहाटे चारला प्रस्‍थान झाले. (jalgaon-news-aashadhi-wari-muktai-palkhai-going-morning-pandharpur)

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. राज्यातील विविध भागांतून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज अशा अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात पायी वारी करत पंढरपुरात दाखल होतात. यंदाची आषाढी एकादशी उद्या (ता. २०) आहे. यावर्षी संत मुक्ताईंच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरला रवाना झाल्या आहेत.

वरणगाव येथील वारकरीस पुजेचा मान

जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई पालखीचे आज मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तत्‍पुर्वी मुक्ताई मंदिरात मूर्तीचा दुग्धाभिषेख, काकड आरती, महाप्रसाद करून पूजन करण्यात आले आहे. वरणगाव येथील वारकरी दीपक मराठे यांनी सपत्‍नी पुजन केले. यावेळी मोठ्या उत्साहात भजन किर्तन आणि आदिशक्ती मुक्ताबाईचा जयघोष केला.

विठू नामाच्‍या गजरात संत मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान
भजनी मंडळाच्या वाहनास अपघात; आठ ठार, चार जखमी

फुलांनी सजविली बस

पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशी वारीसाठी आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून आज (सोमवारी) पहाटे ४ वाजता शिवशाही बसने रवाना झाले. पालखी नेली जात असल्‍याने बस फुलांनी आकर्षक सजविण्यात आली होती. बसने पालखी निघण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने पुजन झाले. तीनशे बारा वर्षांची ही अखंड परंपरा आजतागायत कायम असल्याचे पाहायला मिळाले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com