सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पकडले रंगेहात; २० हजाराची लाच घेताना पकडले

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पकडले रंगेहात; २० हजाराची लाच घेताना पकडले
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पकडले रंगेहात; २० हजाराची लाच घेताना पकडले
bribe

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडले. एसीबीने सदर कारवाई आज दुपारी केली असून या कारवाईमुळे पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-acb-action-Assistant-police-sub-inspector-Caught-taking-bribe-of-Rs-20-thousand)

मुख्‍यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्‍या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केदार यांनी एका प्रकरणात तक्रारदाराकडून २५ हजाराची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २० हजार रूपये निश्‍चीत झाले. यासंदर्भात तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.

bribe
शेतकरी झाला लखपती..झेंडू फुलांना मिळाला उच्‍चांकी भाव

तक्रारीनुसार रचला सापळा

तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करत २० हजाराची लाच घेतांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com