आठ महिन्‍याच्‍या गर्भवतीला दुचाकीची समोरून धडक; महिलेचा मृत्‍यू
गर्भवती

आठ महिन्‍याच्‍या गर्भवतीला दुचाकीची समोरून धडक; महिलेचा मृत्‍यू

आठ महिन्‍याच्‍या गर्भवतीला दुचाकीची समोरून धडक; महिलेचा मृत्‍यू

जळगाव : शतपावलीसाठी पायी चालणाऱ्या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेस दारूच्या नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने समोरून धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. सदर घटना वावडदा– म्हसावद मार्गावर घडली. (jalgaon-news-accident-news-eight-month-old-pregnant-woman-hit-by-two-wheeler-and-Death)

गर्भवती
शनिवारपासून लग्नसोहळ्यांचा धडाका

वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही महिला आठ महिन्‍याची गर्भवती होती. ज्‍योती या नणंद मीना व दीपाली यांच्‍यासोबत शतपावली करत होत्या. या दरम्‍यान सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा) हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत ज्योती यांना समोरून जोरदार धडक देत २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्‍यान ज्‍योती यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार हा दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले.

मृतदेह स्वीकारण्यास नकार

सकाळी ज्योती गोपाळ यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला. या महिलेच्या कुटुंबियांनी संबंधीत दोषीवर कठोर कारवाई होत नाही; तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

महिलेच्‍या कुटूंबियांना धमकावले

दुर्घटना घडल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी मयत महिलेच्या २ नणंदांसह सासूला त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत धमकावले. ज्या दुचाकीने धडक दिली ती आरोपीच्या कुटुंबीयांनी लपवली असल्याचे सांगण्यात आले. आरोपीचे कुटुंबीय त्यानंतर फरार झाले असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान दुचाकीस्‍वाराने जाणीवपूर्वक माझ्या भावजयीला मारून टाकण्यासाठीच वाहनांची धडक दिल्याचा आरोप या महिलेच्या नणंदांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com