ट्रॅक्टरची कारला जोरदार धड़क; दोघांचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टरची कारला जोरदार धड़क; दोघांचा जागीच मृत्यू
ट्रॅक्टरची कारला जोरदार धड़क; दोघांचा जागीच मृत्यू
Accident

जळगाव : शहरातून जाणाऱ्या कानळदा रस्त्यावर आज पहाटे भीषण अपघात झाला. के.सी.पार्कजवळ ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर अन्य एक महिला व पुरुष जखमी झाले आहेत. (jalgaon-news-accident-news-tractor-car-accident-two-death)

जळगाव शहरात सलग तिसऱ्या दिवशी अपघाताचे सत्र सुरु आहे. बुधवारी डंपरच्या धडकेत एका अधिपरिचरिकेला जीव गमवावा लागला. यानंतर आज पहाटेच्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे.

नातेवाइकांना भेटण्यासाठी जात होता परिवार

पहाटे भादली येथील पाटील कुटुंबीय नातेवाईकाला भेटण्यासाठी भोकर येथे कार (क्र. एमएच १४, एफसी ४५५०) ने जात होते. चालक बंडू पाटील होते. कानळदा रस्त्यावरील के.सी.पार्क जकात नाक्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरने या कारला जोरदार धडक दिली. अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे दाबला गेला. यात चालकासह एक महिला जागीच ठार झाली.

नागरिकांनी जखमींना काढले बाहेर

अपघात झाल्याने जोरदार आवाज झाला. यामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी केली. त्यांनीच जखमींना बाहेर काढले. या अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात महिला व पुरुष गंभीर जखमी झाले असून दोघांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com