दीड वर्षानंतर मध्यप्रदेशात महाराष्ट्राची लालपरी रवाना

दीड वर्षानंतर मध्यप्रदेशात महाराष्ट्राची लालपरी रवाना
दीड वर्षानंतर मध्यप्रदेशात महाराष्ट्राची लालपरी रवाना
MSRTC Bus

जळगाव : रावेरसह महाराष्ट्रातून मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या एसटी बस सेवा सुरू करण्यात आल्या. कोरोनाच्‍या लॉकडाउननंतर तब्‍बल दीड वर्षानंतर बससेवा सुरू झाल्‍याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (jalgaon-news-After-a-year-and-a-half-msrtc-bus-service-start-for-Madhya-Pradesh-state)

कोरोनाचा संसर्ग देशात वाढायला लागल्‍यानंतर २२ मार्च २०२० पासून देशात व राज्यात कोरनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळेच सर्व बसेस बंद होत्या. त्यानंतर निर्बंध शिथिल झाल्यानंतर ही मध्यप्रदेश सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रातील एसटी बससेवा ही बंदच राहिली होती.

दिवसभरात लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न

एसटी सेवा बंद असल्यामुळे महाराष्ट्र परिवहन मंडळाचे दिवसाला लाखो रुपयांचे नुकसान होत होते. यात परिवहन मंडळाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले. बससेवा सुरू झाल्याने रावेर बस आगाराच्या आर्थिक फायदा होणार असून महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या ही आर्थिक उलाढालीत मदत होईल.

MSRTC Bus
शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा सरकारचा हट्ट : आमदार भोळे

राज्‍यातून मध्‍यप्रदेशमध्‍ये बस

रावेर- बुऱ्हाणपूर

जळगाव- बुऱ्हाणपूर

शिर्डी- बुऱ्हाणपूर

सुरत- बुऱ्हाणपूर

यासह महाराष्ट्रभरातून गाड्यांच्या फेऱ्या आता मध्यप्रदेश कडे रवाना होऊ लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com