महाविद्यालयातील कट्ट्यांवरील पुन्‍हा ते दिवस; विद्याथ्‍र्यांच्‍या गर्दीने गजबजले आवार

महाविद्यालयातील कट्ट्यांवरील पुन्‍हा ते दिवस; विद्याथ्‍र्यांच्‍या गर्दीने गजबजले आवार
महाविद्यालयातील कट्ट्यांवरील पुन्‍हा ते दिवस; विद्याथ्‍र्यांच्‍या गर्दीने गजबजले आवार
Collage Open

जळगाव : राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली. त्यानुसार आजपासून (ता. २०) जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली आहे. अर्थात तब्‍बल दोन वर्षानंतर महाविद्यालयातील सुन्‍या असलेल्‍या कट्ट्यांवर जमलेल्‍या मित्र–मैत्रिणी जमल्‍याने पुन्‍हा ते दिवस सुरू झाले. (jalgaon-news-after-corona-lockdown-college-open-and-yard-is-crowded-with-students)

कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालय १५ मार्च २०२० पासून बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. २४ मार्चपासून लॉकडाउन संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून महाविद्यालयीन शिक्षण सुरू होउन परिक्षादेखील ऑनलाईन घेउन पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर तब्बल १० ते ११ महिन्यांनंतर १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थिती आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु पुन्हा संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १० मार्च २०२१ पासून पुढील आदेश येईपर्यंत महाविद्यालये बंद करण्यात आली होती.

शाळानंतर महाविद्यालयही गजबजली

जून २०२१ नंतर संसर्ग काही प्रमाणात कमी झाला. यामुळे टप्प्याटप्प्याने ८ वी ते १० वी, ४ ऑक्टोबरनंतर ११ वी, १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर शासन निर्देशासह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत स्थानिक परिस्थिती व प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सेवा सुविधांची उपलब्धता लक्षात घेउन कोविडसंसर्ग नियमावली मार्गदर्शक सूचना मानक या नियमांचे पालन करून १८ वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आजपासून महाविद्यालयांचे आवार देखील फुलले आहेत.

Collage Open
फटाके फोडणारी बुलेट, फॅन्‍सी नंबर प्‍लेट दुचाकींचा शोध; धुळे पोलिसांची कारवाई

वर्गांचे सॅनिटायझेशन

महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्‍यानंतर कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठाच्‍यावतीने सर्व महाविद्यलयांना पत्र दिले. त्‍यानुसार नियमावलीनुसार सर्व वर्गांचे सॅनिटायझेशन करून विद्याथ्‍र्यांचे दोन डोस झाले का याचा डाटा संकलित करून वर्ग सुरू केले जात आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.