
तोंडापूर (जळगाव) : तोंडापूर परिसराला लागून असलेल्या अजिंठा डोंगररांगामधील सोयगाव तालुक्यातील वरखेडी खु. शिवारात विष बाधेमुळे बिबट्याचा (Leopard) मृत्य झाल्याचे उघड झाले. या प्रकरणातील आरोपीस वन विभागाने (Forest Department) अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तीन दिवसाची वन कोठडी ठोठावली आहे. (Jalgaon News leopard Death)
अजिंठा डोंगर रांगाच्या परिसरातील (Jalgaon) वरखेडी खु. शिवारातील गट.नं. ४५ मधील कपाशीच्या शेतात २७ जुलैला बिबट्या मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ह्या बिबट्यावर विष प्रयोग करून मारण्यात आल्याचे समोर आले होते.
मासांत मिसळले विष
अजिंठा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरुवात करुन सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील रउफ शाह उस्मान शाह यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता भटक्या कुत्र्यांना मारण्यासाठी आपण गायीच्या मृत वासराच्या मासात विष मिसळल्याची कबूली दिली. यावरुन वन विभागाने आरोपी रऊप शाह उस्मान शहा यास अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसाची वन कोठडी ठोठावली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे, वनपाल एच. एच. सय्यद, पि. के. शिंदे, एस. व्ही. गव्हंडर, ए. यु. राठोड, वनरक्षक जे. आर. दांडगे आदींच्या पथकाने केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.