पक्षातील गटबाजीवर अजितदादांचा ‘डोस’

पक्षातील गटबाजीवर अजितदादांचा ‘डोस’
पक्षातील गटबाजीवर अजितदादांचा ‘डोस’
Ajit Pawar

जळगाव : महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह फ्रंटलच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीने खळबळ उडालेली असताना पक्षाचे नेते अजित पवार यांनीच या कलहावर सोमवारी (ता. १३) संबंधितांना ‘डोस’ पाजले. (jalgaon-news-ajit-pawar-tolk-bhusawal-online-programe-jalgaon-district-ncp-factionalism)

निमित्त होते, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या गटातील कामांच्या ऑनलाइन उद्‌घाटनाचे. हा व्हर्च्युअल कार्यक्रम झाल्यानंतर बोलताना अजित पवार यांनी जळगावात सुरू असलेल्या पक्षांतर्गत गटबाजीवर भाष्य केले. ‘‘जळगावत पक्षांतर्गत जे काय चालले आहे, त्याच्या आधीही तक्रारी प्राप्त झाल्या.

Ajit Pawar
धुळे महापौर निवडणूक.. ‘करेक्‍ट कार्यक्रम’चे नो टेंशन; विरोधक विखुरलेले

पेपरबाजी करणे योग्य नाही

पक्ष एक परिवार आहे आणि परिवारातील गोष्टींची पेपरबाजी करणे योग्य नाही. पक्षापेक्षा कुणी मोठा नाही, पक्ष कुणासाठी थांबत नाही, याची जाणीव प्रत्येकानेच ठेवली पाहिजे. पक्षाची जबाबदारी एखाद्यावर दिली तर दुसऱ्याला ते पद सोडावेच लागते. त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही.’’ अशा शब्दात पवारांनी या गटबाजीवर भाष्य करत संबंधित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ‘डोस’ पाजले. दोन दिवसांपूर्वीच महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या राजीनाम्यानंतर महानगरातील विविध १२ फ्रंटलच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले होते. पक्षावरील दबावतंत्र झुगारून लावण्याचे संकेत देत पवारांनी पक्षाला कुणी वेठीस धरू नये, असेही बजावले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com