एटीएसने जळगावातून एकाला घेतले ताब्यात

एटीएसने जळगावातून एकाला घेतले ताब्यात
Jalgaon News ATS
Jalgaon News ATSSaam tv

जळगाव : शहरातील मेहरूण परिसरातून (Akola) अकोला एटीएसच्या पथकाने एकाला आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. यामुळे शहरात (Jalgaon) खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) चा खजिनदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Jalgaon Today News)

Jalgaon News ATS
खड्ड्यांभोवती काढली रांगोळी; चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून पालिका प्रशासनाचा निषेध

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. यात जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने (ATS) तिघांना ताब्यात घेतले होते. एकजण मशीदजवळ झोपलेले असतांना ताब्यात घेतले आहे. परंतू यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.

संबंधीत व्‍यक्‍ती जालन्‍यातील

ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो गेल्‍या काही दिवसांपासून जळगावात होता. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय 32 वर्षे, रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे त्‍याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. 21/2022 कलम 121-A, 153-A, 120-ब, 109 भा.द.वि.सहकलम 13(1) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com