अक्षय तृतीयेला सोने खरेदीची चांगली संधी; सोने– चांदीच्‍या दरात घसरण

अक्षय तृतीयेला सोने खरेदीची चांगली संधी; सोने– चांदीच्‍या दरात घसरण
अक्षय तृतीयेला सोने खरेदीची चांगली संधी; सोने– चांदीच्‍या दरात घसरण
Gold SilverSaam tv

जळगाव : अक्षय तृतीयेच्‍या दिवशी सोने, चांदी खरेदी केले जात असते. त्‍यातच सोने व चांदीच्‍या दरात घसरण झाल्‍याने खरेदीदारांसाठी चांगली संधी उपलब्‍ध झाली आहे. गेल्या चार दिवसात चांदीच्या दरात ६९ हजारांवरून ६५ हजारांपर्यत अर्थात चार हजार रूपयांची तर सोन्याच्या दरात ५२ हजार ७०० वरून ५२ हजार २५० अर्थात साडेतीनशे रूपयांची घसरण झाली आहे. (jalgaon Akshay Tritiya has a good chance of buying gold Gold Silver prices fall)

Gold Silver
नात्याला काळिमा! सावत्र मामाकडून अल्पवयीन भाचीवर तीन वेळा बलात्कार

गेल्या महिन्यात रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सोने, चांदीच्या (Gold And Silver) दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोन्याच्या दरात २७०० ची तर चांदीच्या दरात २ हजारांची घसरण झाली होती. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची (Jalgaon News) वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांनी घेतला. सोन्या, चांदीची मोड विकून नफा कमविला आहे. गेल्या काही महिन्यांपासून युद्धात शिथिलता येत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. गेल्या २७ एप्रिलपासूनचा विचार करता सोन्याचे दर प्रतितोळा ५२ हजार ७०० होते. तर चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार होता. ते आज (ता. ३०) अनुक्रमे ५२ हजार ३५० व ६५ हजारापर्यंत खाली आले आहेत.

अक्षय तृतीयेला सोन्याची मोठी विक्री

अक्षय तृतीयेला घेतलेले सोने अक्षय (चिरकाल) टिकते. यामुळे यादिवशी सोने खरेदीची मोठी परंपरा आहे. यादिवशी सोन्याची मोठी विक्री होईल. यासाठी सोने चांदी व्यापाऱ्यांनी सोन्याचे दागिने घडविण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी (ता. ३) अक्षय तृतीया आहे. या दिवशी दर कसे असतील हे सोमवारी समजेल असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.