जिल्हा बँकेत जागा वाटप निश्चित; भाजप व महाविकास आघाडीला इतक्‍या जागा
JDCC Bank

जिल्हा बँकेत जागा वाटप निश्चित; भाजप व महाविकास आघाडीला इतक्‍या जागा

जिल्हा बँकेत जागा वाटप निश्चित; भाजप व महाविकास आघाडीला इतक्‍या जागा

जळगाव : जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधात असलेल्या भारतीय जनता पार्टीसाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत जागा वाटप निश्‍चित केले आहे. यात भाजपाला २१ पैकी ७ जागा देण्याची तयारी सत्ताधार्‍यांनी दर्शविली आहे. दरम्यान असे असले तरी जागा वाटपाच्या अंतीम निर्णयाचा चेंडु सर्वपक्षीय समितीने पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टोलावला आहे.

JDCC Bank
जुगार अड्ड्यावर धाड; १६ जण पोलिसांच्या ताब्यात

जिल्हा बँकेच्या निवडणुक प्रक्रियेला सोमवारपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे बँकेच्या २१ जागांसाठी सर्वपक्षीय पॅनलला अंतीम स्वरूप देण्यासाठी आज आठ सदस्यीय कोअर कमिटीची बैठक शनिवारी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा बँकेच्या विकास संस्था मतदार संघाच्या १५ आणि राखीव ६ जागांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत विरोधात असलेल्या भारतीय जनता पार्टीने ७ जागांची मागणी केली. त्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा झाली. तासभर झालेल्या या चर्चेनंतर राज्यात महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेत भाजपाला ७ जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार इतर १४ जागांचे वाटप करण्यात आले. यात राष्ट्रवादी काँग्रेस ७, शिवसेना ५ आणि काँग्रेस २ असे जागा वाटप निश्चीत करण्यात आले.

निर्णयाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

सर्वपक्षीय पॅनलला अंतीम स्वरूप देण्यासाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागा वाटप झाले असले तरी अंतीम निर्णयाचा चेंडु कोअर कमिटीने पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टोलावला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर या पॅनलचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

जागा वाटप झाली पॅनल निश्‍चीत - पाटील

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कुणी किती जागा लढाव्या यावर निश्‍चीती झाली आहे. असे असले तरी झालेल्या जागा वाटपासंदर्भात पॅनलमधील सहभागी पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार असून त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. निवडणुकीसाठी मात्र सर्वपक्षीय पॅनल निश्‍चीत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com